आयुष्य किती वेगात धावत असतं कळतच नाही. अगदी काल-परवापर्यंत सवंगडीत जाणारा (आमचा मुलगा) नहुष आणि आता त्याच्या सवंगडीच्या प्रवासाविषयी लिहायचं. सवंगडीच्या दशपूर्तीच्या निमित्ताने आई-वडिल म्हणून आम्हांला आमच्या मनातलं सांगायला मिळालं..फुल ना फुलाची पाकळी देऊन श्रद्धा ताईंच उतरायी होण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न!!
लिहायला घेतलं तेव्हा फोटो काढताना, आपण क्लिक करतो ना, तशा झरझर सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या!! "मुलांना शिकवु नका,शिकु द्या" हा सवंगडीचा मूलमंत्र असल्याने प्रत्येक गोष्ट स्वतः करुन बघायची,अनुभवायची ही दृष्टि नहुषला मिळाली. इतरांना कामात मदत करायची ही वृत्ती रुजली.घरी मला कोथिंबीर निवडताना बघुन,नहुष मला कोथिंबीर निवडण्यात मदत करतो.विचारलं की म्हणतो,अगं सवंगडीत असंच,सगळे मिळून काही गोष्टी करायचो, ,खेळायचो.सवंगडीच्या अशाच आठवणींमधे, आमची कधी कोथिंबीर निवडून होते तर कधी मटार सोलुन होतात,आम्हांलाही कळत नाही! मनगटाप्रमाणे मनदेखील बळकट होईल असे उपक्रम ताई आर्वजून घ्यायच्या.
नहुषला सवंगडीत पोचवायला-आणायला जाताना कधीकधी गेटवर श्रद्धा ताईंची भेट व्हायची. ताईंना मी विचारायचे ताई, नहुष तुम्हांलाही खूप प्रश्न विचारतो का? त्यावर स्मितहास्य करुन म्हणायच्या," हो.ह्या वयात त्यांना पुष्कळ प्रश्न असणार आणि आपण त्यांची न कंटाळता उत्तरही द्यायला हवी!" अजून एक आठवण म्हणजे - सवंगडीत सगळे सण साजरे होतात.अतिशय साध्या,सुंदर पद्धतीने! दहिहंडी,भोंडला अगदी बोरन्हाणसुद्धा सवंगडीत नहुषनी अनुभवलं! सणांचा आणि त्याबरोबरच्या आठवणींचा गोफ इतका छान विणला गेला आहे की त्या सुखद आठवणी कायम लक्षात राहतील! तसंच इतर भाषांप्रमाणेच (फाॅरेन लॅग्वेजेसप्रमाणे) मातृभाषा ही देखील उत्तम बोलता-वाचता आली पाहिजे हा दृष्टिकोन दिला. योग्य वयात सवंगडीची संगत लाभली,आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी मिळाली! म्हणूनच असं वाटतं की,ज्यांच्या नावातच "श्रद्धा" आहे अशा श्रद्धा ताईंच्या कार्यपद्धतीमुळे,मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेत असलेल्या प्रयत्नांमुळे असलेले ,त्यांच्या कामाप्रती त्यांची असलेली निष्ठा ह्या व यासारख्या अनेक गोष्टींमुळे नहुषला केवळ१-२ नव्हे तर ५ वर्ष नियमित सवंगडीत जावसं वाटलं ह्यातच सवंगडीचं यश आहे, असं नहुषचे आई-बाबा म्हणून आम्हांला वाटतं!
सवंगडी परिवाराला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!!
नहुषचे पालक
पुलकितचे पालक
माझ्या आणि चैतन्य च्या पालकत्व्याच्या प्रवासात सवंगडी चा खुप महत्वाचा वाटा आहे.
पुलकित २.५ वर्षाचा असल्यापासून सवांगडीला जात होता. श्रद्धा ताईंच्या guidance खाली सर्व मुलं अगदी मनापासून हसत खेळत team building ते दिवेलागणीला श्लोक म्हणत शिकत होती.
आम्हाला शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रिये मध्ये ताई खूप समजावून मुलांच्या कलाने घेणं कस गरजेचं आहे, मुलांना एक independent व्यक्ती म्हणून जगू देणं कसा गरजेचं आहे हे त्यांनी समजावून दिलं.
पुलकित खूप चंचल आणि curious होता. आम्हाला त्याचे प्रश्न आणि त्याच्यासाठी activities शोधणं कठीण झालेलं आणि हातात mobile देणं चुकीचं वाटतं होतं. श्रद्धा ताईंना विचारलं तेव्हा त्यांनी हातात पेन्सिल आणि वही द्यायला सांगितली आणि चित्र काढायला सांगितली..ज्या गोष्टी ऐकतो, बघतो त्या सगळ्याची.. मग काहीही गिरपटलेला का असेना तो आम्हाला explain करायला लागला की काय काढलं आहे आणि आजही तो फावल्या वेळात drawing काढतो देवी, देवता, युद्ध, Stories ऐकल्या आहेत त्यांची..त्याला आजही गप्पा मारायला आवडतात मोबाईल तो hardly हातात घेतो तेही आगा मित्र गेम्स डिस्कस करतात म्हणून बघतो..
पण personal interests gappa, stories, drawing ह्यात आहे .ज्याची पाळामुळ सवंगडी मध्ये श्रध्दा ताईनी रुजवली आहेत.