वेळ: ५ ते ७ आणि ६ ते ८

खेळघर

२.५ ते १० वयोगटासाठी

लहान वयोगटातील मुलांसाठी खेळ हे शिक्षणाच्या प्रक्रियेतील प्रमुख माध्यम आहे.शारीरिक व्यायामाचा सराव शिकण्यासाठी आवश्यक मेंदूच्या रचनेतील बदल हे अधिक दर्जेदार होतात असे मेंदू संशोधन सांगते.
मुलांच्या वयाचा व क्षमतांचा विचार करूनच खेळाच्या मा़ध्यमातून अनेकविध उपक्रम सवंगडी -खेळघरात राबविले जातात. . मुलांमध्ये असणारी क्रियाशिलता,उर्जा यांना योग्य वाट मिळणे किंवा त्यांचा निचरा होण्यासाठी या खेळांचा उपयोग होतो.मुल शारीरिक दॄष्टया सक्षम असायलाच हवं या मताबद्दल कोणाचेच दुमत नाही.पण हे सर्व घडण्याची प्रक्रिया तेवढीच आनंददायी व कायम स्मरणात रहावी.सवंगडी-खेळघरात खेळांमधील नाविन्य कायम जपले जाते.पारंपारीक खेळांसोबत काही मजेशीर,चुरस निर्माण करणारे खेळ मुलांच्या पसंतीस उतरतात.
खेळ खेळून दमणारी मुलं सवंगडीत बघायला मिळतील.प्रत्येक खेळामधील मुलांची आवड व गती याची नोंद ठेऊन त्याप्रमाणे अभ्यासपूर्ण काम करणे हे सवंगडी-खेळघर नियोजनाचा महत्वाचा भाग आहे.गोष्ट ऐकणे व त्यांच्या मदतीने खेळात सहभागी होणे ही कसोटी मुलं खुप आवडीने पार पाडतात.खेळताना मुलांना नवे काही सुचते,काही नवे निर्माण करण्याची उर्मी त्यांच्यात जागॄत होते.सवंगडी-खेळघर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम राबविले जातात.

संपर्कासाठी


खेळघरातील काही अविस्मरणीय क्षण

सवंगडीतील इतर उपक्रम
पालक शाळा
० ते ६ वयोगटाच्या मुलांच्या पालकांसाठी
आनंददायी पालकत्व व आव्हान यामध्ये पालकांना येणारे प्रश्न याचे अभ्यासपूर्ण उत्तर शोधण्यात आम्ही कायम सोबत आहोत....
अभ्यासिका
वयोगट ६ ते १० वर्षे
शैक्षणिक साहित्याच्या मदतीने स्वतः शिकण्यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, मुलांसाठी समुपदेशन....
बालवाचनालय
वयोगट २.५ ते १० वर्षे
वाचन संस्कृती रुजावी व वाढावी यासाठी शास्त्रीय दृष्ट्या मान्यता मिळालेले उपक्रम मराठी,हिंदी,इंग्रजी पुस्तक मुलांना सहज...
संवादकट्टा
वयोगट २.५ ते ६ वर्षे
मुलांच्या सामाजिक,भावनिक व सृजनशील विकासासाठी अभ्यासपूर्ण उपक्रम स्पर्धा,ताण,स्वभान यासाठी योग्य दिशादर्शक...