संवाद हा सर्वच वयोगटातील मुलांच्या विकासाचा महत्वाचा टप्पा आहे.
मुलांचे बहुतांशी खेळ हे इतरांबरोबर खेळण्याचे असल्यामुळे मुलांना एकमेकांना समजून घेण्याची मिळणारी संधी त्यांचे संवाद कौशल्य वाढवते.
मुले इतरांचे म्हणणे समजावून घेत असतात तसेच समोरच्या मित्र-मैत्रिणींना समजेल अशा भाषेत संवाद करू लागतात.अशा संवादाच्या संधी मुलांसाठी उपलब्ध करण्याचे काम संवाद कट्यात होते.
मुलांना त्यांच्या पातळीवर अनेक ताणतणाव असतात.या दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचे काम संवाद कट्यात घडते.
स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मुलांना हवे असते.
भावनांना शब्दांची व विचारांची साथ मिळाल्यावर मुलांमधील आत्मविश्वास वाढतो हे संवाद कट्याच्या अनुभवातून जाणवते.
संपर्कासाठी
सवंगडीतील इतर उपक्रम
खेळघर
वयोगट २.५ ते ६ वर्षे
गाणी,गोष्टी,भाषिक खेळ,काळानुरूप
बदलणारे सण सोहळ्यात मुलांना हवेहवेसे
क्षण अनुभवता येतात ....