वेळ: ५ ते ७ आणि ६ ते ८

सवंगडीतील उपक्रम

खेळघर
वयोगट २.५ ते ६ वर्षे
गाणी,गोष्टी,भाषिक खेळ,काळानुरूप बदलणारे सण सोहळ्यात मुलांना हवेहवेसे क्षण अनुभवता येतात ....
अभ्यासिका
वयोगट ६ ते १० वर्षे
शैक्षणिक साहित्याच्या मदतीने स्वतः शिकण्यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, मुलांसाठी समुपदेशन....
बालवाचनालय
वयोगट २.५ ते १० वर्षे
वाचन संस्कृती रुजावी व वाढावी यासाठी शास्त्रीय दृष्ट्या मान्यता मिळालेले उपक्रम मराठी,हिंदी,इंग्रजी पुस्तक मुलांना सहज...
संवादकट्टा
वयोगट २.५ ते ६ वर्षे
मुलांच्या सामाजिक,भावनिक व सृजनशील विकासासाठी अभ्यासपूर्ण उपक्रम स्पर्धा,ताण,स्वभान यासाठी योग्य दिशादर्शक...
पालक शाळा
० ते ६ वयोगटाच्या मुलांच्या पालकांसाठी
आनंददायी पालकत्व व आव्हान यामध्ये पालकांना येणारे प्रश्न याचे अभ्यासपूर्ण उत्तर शोधण्यात आम्ही कायम सोबत आहोत....

मुलांच्या सर्वांगिण विकासाचा प्रयोगशील उपक्रम.

संस्कारक्षम व सुरक्षित वातावरण.
जीवनमूल्य उंचावणारे उपक्रम.
आनंददायी शिक्षणाची ओळख.
योगासन, शारीरिक व मानसिक प्रगतीचे खेळ .
चित्रकला, ओरीगामी, हस्तकला व सुलेखन यासाठी विशेष उपक्रम
बालगीते, अभीनय गीते अश्या अनेक गीत प्रकारांची ओळख
प्रार्थना , शोल्क , संस्कृतीची ओळख तसेच स्वावलंबन व स्वयंशिस्त रुजवणारे उपक्रम .
मुलांसाठी खेळ व पुस्तक वाचनालय .
पारंपारीक खेळांना प्राधान्य
पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक केंद्र .

थोडक्यात, सवंगडीबद्दल...

श्रध्दा संजय सांगळे: संचालिका श्रद्धा सांगळे यांची ओळख बालशिक्षिका, संशोधक,शैक्षणिक सल्लागार,संस्था संचालकपदी जबाबदारी पार पाडताना शिकणे शिकविण्याचे काम करणारी विदुषी श्रद्धा सांगळे.

मुलांच्या खेळाला व खेळण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे.खेळ क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवण्याचे मोलाचे काम करतात.

मुलांना जीवन कौशल्याची ओळख करुन देणारे खेळ व अनुभवातून शिक्षणाची वाट शोधणारे अनेक संशोधनातून सिध्द झालेले विचार श्रद्धाताईंच्या उपक्रमात प्रर्कषाने जाणवतात.

शिक्षकांच्या भूमिकेतून शैक्षणिक अभ्यासक्रमाला स्वयंम अध्ययनाचे अनेक साहित्यप्रकार श्रध्दाताईंनी तयार केले आहेत. मुलांच्या भाषेसंदर्भातील संशोधनातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे मोलाचे कार्य त्यांनी पार पाडले आहे. चित्रकला,नृत्य,गायन याची आवड व शिक्षण घेतल्यामुळे सवंगडीच्या उपक्रमात यासर्व कलांचा समाविष्ट केला जातो.असे प्रयोगशील उपक्रम गेली २१/२२ वर्षे त्या अखंडपणे राबवत आहेत.

सवंगडीची संचालिका म्हणून त्या कार्यभार संभाळत आहेत.

संचालिका: श्रध्दा संजय सांगळे

पालकांचे अभिप्राय

आयुष्य किती वेगात धावत असतं कळतच नाही. अगदी काल-परवापर्यंत सवंगडीत जाणारा (आमचा मुलगा) नहुष आणि आता त्याच्या सवंगडीच्या प्रवासाविषयी लिहायचं. सवंगडीच्या दशपूर्तीच्या निमित्ताने आई-वडिल म्हणून आम्हांला आमच्या मनातलं सांगायला मिळालं..फुल ना फुलाची पाकळी देऊन श्रद्धा ताईंच उतरायी होण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न!! अधिक वाचा

नहुषचे पालक

माझ्या आणि चैतन्य च्या पालकत्व्याच्या प्रवासात सवंगडी चा खुप महत्वाचा वाटा आहे. पुलकित २.५ वर्षाचा असल्यापासून सवांगडीला जात होता. श्रद्धा ताईंच्या guidance खाली सर्व मुलं अगदी मनापासून हसत खेळत team building ते दिवेलागणीला श्लोक म्हणत शिकत होती.आम्हाला शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रिये मध्ये ताई खूप समजावून अधिक वाचा

पुलकितचे पालक

अधिक प्रतिक्रिया वाचा