वेळ: ५ ते ७ आणि ६ ते ८

सवंगडी विषयी

थोडक्यात, सवंगडीबद्दल...

"मुलांना शिकवू नका,शिकू द्या" हा मूलमंत्र घेऊन सवंगडी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरवात झाली.

सवंगडीची स्थापना १ फेब्रुवारी २०११ रोजी मुलूंड (पू) येथे झाली. मुलांना बालपणाची निखळ व निरागस अनुभव देणारी हक्काची अशी जागा असायला हवी हा सवंगडी सुरू करतानाचा पहिला विचार होता. सवंगडीच्या पहिल्या दिवसापासून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करूनच सर्व उपक्रमाची मांडणी करायचे नियोजन काटेकोरपणे जात आहे.जेंव्हा सगळीकडे इंग्रजी नावाची ओळख घेऊन त्याच नावाचे बोर्ड (पाट्या)बघायला मिळत होते तेंव्हाच सवंगडी अस्सल मराठी मातीतला,मातृभाषेची ओळख अनेक माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न करणारा उपक्रम मुलूंड (पू)इथे सुरू झाला. २०२१ हे वर्ष सवंगडीचे सुवर्ण वर्धापनाचे आहे.

प्रत्येक वर्षी मुलांच्या आवडीनुसार व मुलांना शिकण्याची संधी देणारे खेळ बदलत गेले. जुने ते सोने म्हणत असताना काळाबरोबर आधुनिकता ही मुलांसोबत सवंगडीत आली. प्रत्येक उपक्रम अभ्यासपूर्ण पध्दतीने व साधेपणाने इथे राबविला जातो. सवंगडीच्या प्रवासात मुलांच्या पालकांना ही सहज ओळख पालकांनी होत जाते.

दशकपूर्ती नंतर सवंगडीच्या शाखा इतरत्र सुरू करण्याचा संकल्प घेत आहोत. कोव्हीड नंतरचा काळ सर्वांनाच आव्हानात्मक होता,विशेष तोटा झाला तो लहान वयातील मुलांचा म्हणूनच सवंगडीच्या माध्यमातून मुलूंड बाहेर काम सुरू करत आहोत.

श्रध्दा संजय सांगळे: संचालिका.

श्रद्धा सांगळे यांची ओळख बालशिक्षिका, संशोधक,शैक्षणिक सल्लागार,संस्था संचालकपदी जबाबदारी पार पाडताना शिकणे शिकविण्याचे काम करणारी विदुषी श्रद्धा सांगळे.

मुलांच्या खेळाला व खेळण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. खेळ क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवण्याचे मोलाचे काम करतात.

मुलांना जीवन कौशल्याची ओळख करुन देणारे खेळ व अनुभवातून शिक्षणाची वाट शोधणारे अनेक संशोधनातून सिध्द झालेले विचार श्रद्धाताईंच्या उपक्रमात प्रर्कषाने जाणवतात.

शिक्षकांच्या भूमिकेतून शैक्षणिक अभ्यासक्रमाला स्वयंम अध्ययनाचे अनेक साहित्यप्रकार श्रध्दाताईंनी तयार केले आहेत. मुलांच्या भाषेसंदर्भातील संशोधनातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे मोलाचे कार्य त्यांनी पार पाडले आहे. चित्रकला,नृत्य,गायन याची आवड व शिक्षण घेतल्यामुळे सवंगडीच्या उपक्रमात यासर्व कलांचा समाविष्ट केला जातो. असे प्रयोगशील उपक्रम गेली २१/२२ वर्षे त्या अखंडपणे राबवत आहेत.

सवंगडीची संचालिका म्हणून त्या कार्यभार संभाळत आहेत.