
श्रध्दा संजय सांगळे: संचालिका श्रद्धा सांगळे यांची ओळख बालशिक्षिका, संशोधक,शैक्षणिक सल्लागार,संस्था संचालकपदी जबाबदारी पार पाडताना शिकणे शिकविण्याचे काम करणारी विदुषी श्रद्धा सांगळे.
मुलांच्या खेळाला व खेळण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे.खेळ क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवण्याचे मोलाचे काम करतात.
मुलांना जीवन कौशल्याची ओळख करुन देणारे खेळ व अनुभवातून शिक्षणाची वाट शोधणारे अनेक संशोधनातून सिध्द झालेले विचार श्रद्धाताईंच्या उपक्रमात प्रर्कषाने जाणवतात.
शिक्षकांच्या भूमिकेतून शैक्षणिक अभ्यासक्रमाला स्वयंम अध्ययनाचे अनेक साहित्यप्रकार श्रध्दाताईंनी तयार केले आहेत. मुलांच्या भाषेसंदर्भातील संशोधनातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे मोलाचे कार्य त्यांनी पार पाडले आहे. चित्रकला,नृत्य,गायन याची आवड व शिक्षण घेतल्यामुळे सवंगडीच्या उपक्रमात यासर्व कलांचा समाविष्ट केला जातो.असे प्रयोगशील उपक्रम गेली २१/२२ वर्षे त्या अखंडपणे राबवत आहेत.
सवंगडीची संचालिका म्हणून त्या कार्यभार संभाळत आहेत.
आयुष्य किती वेगात धावत असतं कळतच नाही. अगदी काल-परवापर्यंत सवंगडीत जाणारा (आमचा मुलगा) नहुष आणि आता त्याच्या सवंगडीच्या प्रवासाविषयी लिहायचं. सवंगडीच्या दशपूर्तीच्या निमित्ताने आई-वडिल म्हणून आम्हांला आमच्या मनातलं सांगायला मिळालं..फुल ना फुलाची पाकळी देऊन श्रद्धा ताईंच उतरायी होण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न!! अधिक वाचा
नहुषचे पालक
माझ्या आणि चैतन्य च्या पालकत्व्याच्या प्रवासात सवंगडी चा खुप महत्वाचा वाटा आहे. पुलकित २.५ वर्षाचा असल्यापासून सवांगडीला जात होता. श्रद्धा ताईंच्या guidance खाली सर्व मुलं अगदी मनापासून हसत खेळत team building ते दिवेलागणीला श्लोक म्हणत शिकत होती.आम्हाला शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रिये मध्ये ताई खूप समजावून अधिक वाचा
पुलकितचे पालक